बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

पुणे | गेल्या काही वर्षापासून राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. महिलांवर अत्याचाराच्या गुन्हे आणि सायबर गुन्हे वाढताना दिसत असतानाच आता पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Crime) पुण्यातील जांभूळवाडी दरीपुलाजवळ एक तृतीयपंथीचा (transgender) मृतदेह आढळून आला आहे.

नेहमीप्रमाणे परिसरातील काही नागरिक सकाळी माॅर्निग वाॅकला जात होते. त्यावेळी या नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह आढळून आला. इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या बाजूच्या रस्त्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

भारती विद्यापीठातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखला झाले. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाची पडताळणी करून तपास सुरू केला. सागर उर्फ सारिका उजागरे असं या तृतीयपंथीचं नाव असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, दगडाने ठेचून या तृतीयपंथी व्यक्तीचा खून झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून यासाठी पोलीसांची एक टीम देखील तयार करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, कारणही सांगितलं…

“वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं”

डीएसकेंना खरोखर आमदार चावला का?, आता नवीनच माहिती आली समोर

मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार नाही!

रात्रीस खेळ चाले! फडणवीस आणि काँग्रेस आमदाराच्या गुप्तभेटीच्या चर्चेनं मोठी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More