बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोशल मीडियाबाबत आमिर खाननं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण

मुंबई | बाॅलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता अमिर खानने अचानक सोशल मीडिया सोडल्याचं सांगितलं आहे. सुपरस्टारने आपल्या शेवटच्या ‘इंस्टाग्राम’ पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. माझे मन तुमच्या प्रेमाने भरले आहे. त्याने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आमिर खानचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ते सतत सोशल मीडियावरील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत, इतकेच नाही तर त्याने असा अचानक हा निर्णय का घेतला?, हा प्रश्न देखील ते विचारत आहेत.

आमीरने आपल्या या ‘गुडबाय’ पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे हृदय तुमच्या प्रेमाने भरले आहे आणि ही माझी शेवटची पोस्ट आहे. अभिनेता सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्थ आहे. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट ऑफ बॉलिवूड’ने आपला आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ रिलीज होईपर्यंत आपला फोन ‘लॉक’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सेटवर त्याचा मोबाईल सतत वाजल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी त्याने फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या जगताला निरोप देऊन, आमीरने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या हँडलवर सतत समर्थन आणि प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

दरम्यान, आमिरने पुढे लिहिले आहे की, ‘यानंतर एकेपीला (आमिर खान प्रॉडक्शन) त्याचे अधिकृत चॅनेल बनवले आहे, तर भविष्यात तुम्हाला त्याच्या चित्रपटांच्या अपडेट्स त्याच्या हँडल @akppl_official वर मिळेल. भरपूर प्रेम. 2018 मध्ये आमीरने आपल्या वाढदिवशी आपल्या आईचे छायाचित्र शेअर करून इंस्टाग्रामवर डेब्यू केला होता, ज्यामुळे इंटरनेटवर त्याचा एक नवा फॅन बेस निर्माण झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

थोेडक्यात बातम्या – 

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा- प्रसाद लाड

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More