बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या धनश्रीची मृत्यूशी झुंज, अनेकांनी केलं मदतीचं आवाहन!

पुणे | अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेली पुण्यातील तरूणी धनश्री कुंभारचा अपघात झाला आहे. प्रशासकीय सेवेते रुजू होण्यासाठी आपल्या अभ्यासोबत सामाजिक जबाबदारी म्हणून ती गरिब मुलांसाठी झटत होती मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होतं. रस्ता ओलांडताना एका रिक्षा चालकाने तिला जोरात धडक दिली.

धनश्रीला बसलेली धडक इतकी भीषण होती की ती बेशुद्ध झाली आणि कोमात गेली. पुण्यातील शिवणे- उत्तमनगर रस्त्यावर तिचा अपघात झाला. या अपघाताला 11 दिवस झाले आहेत मात्र अद्यापही धडक देणारा रिक्षाचालक फरार आहे.

मुळची सातारा जिल्ह्यातील कराडची असलेली धनश्री पुण्यात शिवणे येथे वास्तव्यास आहे. धनश्रीने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर रानडे इन्सिट्युटमधुन पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर धनश्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. हा अभ्यास करताना ती समाजउपयोगी कामेही करत होती यामध्ये गरिब मुलांना मोफत शिकवणे त्यांच्या अडचणी सोडवणे अशा प्रकराची काम ती करत होती.

दुर्देवाने तिचा अपघात झाला असून सध्या तिच्यावर नवले हॉस्पीटलमध्ये उपचार चालू आहेत. तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ती कोमात असून तिच्या हाताच्या बोटांची हालचाल होत आहे. मात्र उपचारासाठी 15 लाख लागणार आहेत. त्यामुळे तिला मदतीची गरज आहे. धनश्रीने समाजासाठी तिच्या परीने 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आता पुढे येऊन प्रत्येक नागरिकांनी धनश्रीच्या उपचारासाठी आर्थिक साहाय्य करण्याची गरज आहे.

गुगल पे नंबर – 9922778408 (सुनिल कुंभार- धनश्रीचे वडील),  Sunil Anant Kumbhar, Bank of India, Branch
Warje Malwadi (Pune),  SAVING ACCOUNT NO. 053310110008792,   IFSC : BKID0000533 

May be an image of 1 person

May be an image of 15 people and people smiling

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ शहराने केला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्टर प्लॅन

‘सरकार पाडण्यासाठी भाजप नेते पोते भरून पैसे घेऊन हेलिकॉप्टरने आले’; माजी मुख्यमंत्र्यांचा शहांवर आरोप 

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदर भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ

काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे, तुम्ही भाजपला मत द्या- स्मृती इराणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More