Top News मनोरंजन

सिनेसृष्टीला धक्का! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला गमवावा लागला आपला जीव

मुंबई | टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन झालं आहे. यासंदर्भा टीव्ही9 ने वृत्त दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार चालू होते.

कोरोना पॉझीटिव्ह सापडल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.  त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिच्यावर उपचार चालू असताना दिव्याचं निधन झालं आहे. गोरेगावच्या एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सेवन हिल्समध्ये दिव्याला नेण्यात आलं असल्याची माहिती आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर दिव्याची आक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती आहे. तिच्यासोबत तिची आई रूग्णालयात होती.

दरम्यान, दिव्याच्या पतीने तिला धोका दिला असून त्याने दिव्याला सोडून दिलं असल्याचा आरोप दिव्याच्या आईने केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावं- संजय राऊत

राजधीनीतील कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचे लंडनमध्येही पडसाद

उदय सामंतांनी प्राध्यापकांसाठी केली ही मोठी घोषणा!

डाॅ. शीतल आमटे प्रकरणाचा तपास घातपाताच्या दिशेने?; १६ जण ताब्यात

ट्विटरवर उडाला वादाचा भडका; अनिल कपूर आणि अनुराग कश्यप भिडले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या