बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अफगाणिस्तानमध्ये महिलांना पुन्हा मुलं जन्माला घालण्याचं मशीन बनवलं जाणार”

मुंबई |  तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी परिस्थिती खुप चिघळली. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सुरू आहे.  या परिस्थितीवर आता जगभरातून चर्चा होत आहे. अफगाणिस्तानमधील महिलांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण याबद्दलही आता जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जाते. बॉलिवुड कलाकारांनी देखील यावर संताप व्यक्त केला. अशातच अफगाणिस्तानची मात्र सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली अभिनेत्री वरीना हुसैनने देखील अफगाणिस्तानच्या भयानक परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.

मी भारतात 10 वर्षांपासुन राहत आहे. आपल्या भविष्यातील चांगल्या आयुष्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात पलायन करणे, माझ्यासाठी खुपच त्रासदायक आणि कठिण होऊन गेलं होतं. परंतु आम्ही खुप नशिबवान आहोत, आम्हाला भारतासारख्या देशात राहायला मिळतंय, असं अभिनेत्री वरीना हुसैनने एका मुलाखतवेळी ती बोलत होती.

अफगाणिस्तानमध्ये आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती 20 वर्षापूर्वीही होती. त्यामुळे माझ्या कुटुंबावर देश सोडण्याची वेळ आली होती. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात जो विकास झाला होता, तो पुन्हा आता ढासळत चालला आहे. तेथील महिलांना परत आता मुलं जन्माला घालणारं मशिन बनवलं जाणार आहे, आणि तरूणांनाच्या मनात आता फक्त द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असंही वरीना म्हणाली.

दरम्यान, अभिनेत्री वरीना हुसैनने 2018 साली सलमान खान निर्मित ‘लवयात्री’ या चित्रपटांतुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा आयुष शर्मा या बॉलिवुड अभिनेत्यासोबत वरीनाला काम करायला मिळालं होतं.

 

 

थोडक्यात बातम्या- 

सरकारी मालमत्ता विकून मिळवा पैसे, अर्थमंत्री करणार ‘या’ योजनेची सुरुवात, पाहा व्हिडीओ

‘तालिबानी भारतासाठीही ठरू शकतात धोकादायक???’; शिया धर्मगुरू मौलानांचा भारताला गंभीर इशारा

नीती आयोगाच्या ‘त्या’ गंभीर इशाऱ्यावर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

‘तहसीलदार मॅडम ‘तो’ विचार डोक्यातून काढून टाका’; अण्णा हजारेंचा तहसीलदारांना मोलाचा सल्ला

महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त! प्रकृतीबाबत आली ‘ही’ मोठी माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More