बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा’; मुंबईतील 102 वर्षीय आजीची कोरोनावर मात

मुंबई | कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राणा गमवाव लागला आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलल्या अनेकांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतील 102 वर्षीय सुशीला पाठक यांनी कोरोनावर मात केली आहे.

अनेकांच्या मनात कोरोनाची भीती बसली आहे. पण ही भीती तुम्हाला कोरोनावर मात करु देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोरोनाला घाबरलात. तर तुमच्यावर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोरोनाला घाबरु नका. त्याच्याशी दोन हात करा. तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल, असं कोरोनावर मात केलेल्या 102 वर्षीय सुशीला पाठक यांनी म्हटलं आहे.

सुशीला पाठक या मुंबईतील अंधेरी येथे राहतात. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ठाण्यातील होरायझन प्राईम या रुग्णालयात उपचार घेत होत्या. जवळपास 15 दिवसांत आजींनी कोरोनावर मात केली आहे. डिस्चार्ज देताना त्यांनी केक कापून अभिनंदन डॉक्टरांनी आजींचं अभिनंदन केलं.

दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मात्र राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

रणधीर कपूर यांनी ‘या’ कारणाने वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय, म्हणाले…

…म्हणून तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More