बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती

कोलकाता | नव्वदीच्या दशकात बाॅलिवूडचा स्टार अभिनेता राहिलेला मिथुन चक्रवर्ती आता राजकारणाच्या रिंगणात उतरला आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रचाराची जबाबदारी अंगावर घेतली. त्यानंतर त्यांना भाजपकडून निवडणुकीत लढण्यासाठी जागा मिळू शकेल अशी आशा होती, पण काही दिवसांपुर्वी भाजपने जाहीर केलेल्या अंतिम यादीत देखील त्यांना उमेदवारी भेटली नाही. त्यानंतर चक्रवर्ती  यांनी यावर उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी यांच्या विरूद्ध लढण्यास तयार असल्याचं मिथून चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. तर भाजपने अद्याप मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित केलं नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास देखील माझी तयारी आहे. पक्षाने योग्य काय तो निर्णय घ्यावा, असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मिथुन चक्रवर्ती हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी देखील होताना दिसत आहे. तर त्यांच्या रोड शो मध्ये देखील गर्दी जमा होताना दिसत आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित झालं नसल्यानं चक्रवर्ती मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातय.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी भाजपमध्ये चक्रवर्ती यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना ‘Y+’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली. ‘मी एक नंबरचा कोब्रा आहे…एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जालं’, असं चक्रवर्ती ममतांना म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…

‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

“रिषभ पंत असाच खेळत राहिला तर एक दिवस धोनीलाही मागे टाकेल”

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More