मुंबई | संजय राऊतांना(Sanjay Raut) रविवारी रात्री ईडीने(ED) अटक केल्याने आत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी या विरोधात शिवसैनिक आंदोलन करत आहेत. काही राजकीय नेत्यांनी याला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोध केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख(NCP) शरद पवार (Sharad Pawar) हे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
परंतु शरद पवारांना संजय राऊतांंना अटक झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शरद पवांरांनी बोलणं का टाळलं ?, यावर आता अनेक चर्चा रंगल्या आहेत. नंतर तरी शरद पवार यावर काय बोलतील का?, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
संजय राऊतांनी ईडीच्या अटकेवर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, सध्या महाराष्ट्राला कमजोर करण्याचे काम काहींकडून सुरू आहे. महाराष्ट्र कमजोर होत आहे पेढे वाटा, असा टोला अप्रत्यक्षपणे राऊतांनी भाजपला लगावला. आता सामना(Samana) अग्रलेखातून या राऊतांच्या ईडी अटकेवर काय बोललं जाणार याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.
दरम्यान, अजित पवार(Ajit Pawar) यावर म्हणाले होते की, जर संजय राऊतांनी काय केले असेल तर त्यांना अटक होईल, जर नसेल केलं तर अटक नाही होणार. परंतु शरद पवार यावर कधी आणि काय प्रतिक्रिया देणार याची वाट सर्वजण पाहत आहेत.
थोडक्यात बातम्या–
राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…
संजय राऊतांच्या घरातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त
सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं
“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”
मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य, लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार
Comments are closed.