बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

संभाजीराजेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. 2009 साली लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे, असं त्यांनी म्हटलं.

घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरिब लोकांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती- संभाजीराजे

कोरोना पूर्णपणे गेलेला नाही तो पुन्हा वाढतोय, मास्क घालत रहा- उद्धव ठाकरे

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर

“राक्षसी वृत्तीचं मुंडकं छाटल्याशिवाय मसनातील महाकाली शांत होणार नाही”

अनिल परबांवरील कारवाईनंतर अजित पवारांचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More