बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर आता शिवसेना नेतेही भडकले, म्हणाले…

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बेधडक वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी नुकताच केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पटोले यांनी केलेल्या या आरोपांवर आता शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत यांनी पटोलेंनी केलेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांना काही बोलायचं असेल तर त्यांनी खासगीमध्ये बोलावं, असं चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लाच अरविंद सावंत यांनी दिला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

काही अडचण असल्यास मुख्यमंत्री किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा, परंतु असं बोलणे योग्य नाही. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यामुळे आपण काय बोलतोय याचं भान राहिलं पाहिजे. पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खासगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये, असं सावंत अरविंद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्या मित्र पक्षांचं काय प्लॅनिंग आहे, याबद्दल मला कल्पना नाही, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

रजनीकांत यांनी राजकारणाला ठोकला कायमचा रामराम; पक्षही केला बरखास्त!

‘हे सरकार अहंकारी असेल तर सत्तेतून काढावे लागेल’; राकेश टिकैतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी; पुढील पाच दिवस ‘या’ भागांमध्ये पडणार संततधार

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नानांच्या आरोपावर अजित पवार संतापले; म्हणाले…

“पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More