बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लागला की मेळ! ना काॅंग्रेस, ना भाजप…’या’ भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा

मुंबई | देशात 2014 साली मोठं राजकीय परिवर्तन (Big Change in National Politics) झालं होतं. देशाच्या इतिहासात प्रथमच काॅंग्रेसव्यतिरिक्त (Congress) स्पष्ट बहुमताचं सरकार सत्तेत आलं होतं. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अफाट लोकप्रियतेच्या जोरावर भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेत आहे. पण सध्या भाजप विरोधी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याला कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chif Minister Of West Bengal Mamta Banerjee) यांचा महाराष्ट्र दौरा.

भाजप विरोधाचा प्रमुख चेहरा म्हणून सध्या ममता आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी देशभर दौरा करत आहेत. महाराष्ट्रात दौरा करताना टीएमसी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण ममता यांनी महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याचा कसलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. परिणामी राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाची देशपातळीवर अंमलबजावणी करण्याच्या विचारात असल्याचं सध्या सर्वत्र बोललं जात आहे.

ममता बॅनर्जी यांनी गत काही महिन्यांपासून काॅंग्रेसला हादरे द्यायला सुरूवात केली आहे. इतकच नाही तर आजही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेेटीनंतर ममता यांनी सध्या युपीएबाबत कसलाही विचार नसल्याचं स्पष्ट केल्यानं विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. परिणामी ममता बॅनर्जी सध्या भाजपला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, प्रादेशिक पक्षांच्या माध्यमातून ममता या भाजपला टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहेत. पण काॅंग्रेस सोडून देशात भाजपला रोखता येणार आहे का?, हा प्रश्न सुद्धा सर्व राजकीय जाणकारांना देखील पडला आहे. ममता यांनी लोकसभा निवडणूक 2024पूर्वी भाजपला रोखण्यासाठी तयारी चालू केली असल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या 

…अन् ‘त्या’ घटनेनंतर खासदारानं वाटले चक्क ‘चाॅकलेट आणि आंब्याचे पापड’

‘Sharad Pawar युपीएचे नेते होणार का?’, ममता बॅनर्जी म्हणतात…

“ठाकरे सरकार अपशकुनी, फडणवीस सरकारनं मिळवलेलं Maratha Reservation घालवलं”

IPL Retention: कहीं खुशी कहीं गम, वाचा रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

“वीज फुकटात तयार होत नाही, शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More