बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजिंक्य’पर्व संपण्याच्या वाटेवर?, कसोटी संघाचं उपकर्णधारपद गमावलं

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट (Indian Team) संघ सध्या मोठ्या बदलातून जात आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा नियोजित कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohali) सध्या आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. तर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Vice Captain Ajinkya Rahane) याला खराब कामगिरीचा फटका बसला आहे.

बीसीसीआयनं नुकतंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (South Africa Tour) भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3 कसोटी सामने खेळणार आहे. तर भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा खराब फाॅर्ममध्ये असल्यानं त्याच्या जागी भारतीय वनडे आणि ट्वेंटी कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

गत एक वर्षापासून अजिंक्य रहाणे एकही शतक झळकावू शकला नाही. परिणामी त्याला संघातून डच्चू दिला जाण्याची शक्यता होती. पण संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तसंच रोहित शर्मा हा आगामी काळात भारतीय क्रिकेटचं नेतृत्व करणार यावर बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान, बीसीसीआयनं भारतीय संघात अनेक बदल करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला भारतीय कसोटी संघात सामिल करण्यात आलं नाही तर अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे देखील संघात सामिल नाहीत.

थोडक्यात बातम्या 

“खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर

बिपीन रावत यांचं निधन, राष्ट्रपतींचा दौरा रद्द तर पंतप्रधान मोदींनी बोलवली महत्त्वाची बैठक

मोठी बातमी! हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन

IAF Helicopter Crash: अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू; आली महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More