अजित पवारांना यापुढे माफी नाही; बीडमध्ये शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला!

बीड | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद पेटलेलाच आहे. बीडमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून शिवसैनिकांनी पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला.

अजित पवारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याची लायकी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळात ढकलण्याचे पाप अजित पवारांनी केले आहे, या पुढे अजित पवारांना माफी नाही, असं कार्यकर्ते यावेळी म्हणाले.

भ्रष्टाचाराच्या गटारात राहणाऱ्यानी गुण संपन्न व्यक्तीवर चिखलफेक करू नये, हा शिवरायांचा महाराष्ट्र अजित पवारांना कधीच माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसैनिकांनी अजित पवारांचा निषेध केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंचा मी राजकीय प्रतिस्पर्धी नाही, मी त्यांचा आदर करतो!

-दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टेक्नीकल दिवाळी’ लघुपट प्रदर्शित

-28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी गजाआड

-मराठ्यांना आरक्षणाने मिळणारे फायदे आरक्षणाआधीच देण्याचं काम शासनाने सुरु केलंय!

-राम कदमाला झोडपायला मी 100 कोल्हापूरी चपलेचं जोड आणलेत!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या