Top News मुंबई

“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी भाषणादरम्यान फडणवीसांना चिमटे काढले.

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता असं मला वाटतं. त्यांना बरंच ज्ञान आहे, आता ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करुन घेऊ. जर फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राच्या 288 आणि खालच्या सभागृहाची एकमताने मान्यता राहिल. त्यात सर्वात आनंदित सुधीर मुनगंटीवार होतील. गळ्याची आण खोटं बोलतं नाही, असं म्हणत अजित पवारांनी आपल्या भाषनातून चिमटे काढले.

फडणवीसांनी लिहिलेल्या पुस्तकातून मला जानवायला लागलं आहे की देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता. त्यामुळे तुम्ही राजकारण सोडून तुम्ही लेखक व्हायला हरकत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गमतीचा भाग जाऊ द्या. पण अर्थसंकल्पावर पुस्तक लिहिल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून कौतुक करतो, असं पवार म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोण अमृता फडणवीस?, त्यांच्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ‘या’ कार्यकर्त्याला राष्ट्रवादी देणार मोठी संधी?

15 ते 20 आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या