काय सांगता! पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारने घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, मानधन ऐकून थक्क व्हाल
मुंबई | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पृथ्वीराज हा चित्रपट ‘पुथ्वीराज रासो’ या पुस्तकावर आधारीत असून यात राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळणार आहे.
अभिनेता अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर मानुषि छिल्लर (Manushi Chillar) ही संयोगिताची भूमिका साकारताना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) व सोनू सूद (Somu Sood) देखील पृथ्वीराजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
चंद्रकांत द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज (Prithviraj) चित्रपटासाठी भव्य-दिव्य असा सेट उभारण्यात आला आहे. या चित्रपचाचं बजेट 300 कोटी असल्याचं सांगितलं जात असताना या चित्रपटातील कलाकारांनीही तगडं मानधन घेतलं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने पृथ्वीराज चित्रपटासाठी सर्वाधिक असं तब्बल 60 कोटी रूपयांचं मानधन घेतलं आहे.
दरम्यान, मानुषि छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार असून तिने 1 कोटी मानधन घेतलं आहे. तर संजय दत्तने 5 कोटी व सोनू सूदने 3 कोटी मानधन घेतलं आहे. पृथ्वीराज 3 जून रोजी हिंदू, तामिळ आणि तेलूगू भाषेत प्रदर्शित होणार असून चाहते प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘मी पण अयोध्येला जाणार कारण मलाही…’; गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन
‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल
रुग्णालयातील फोटोंवरुन नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, पहिला गुन्हा दाखल
Comments are closed.