बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोणाच्या जिवावर माज करतात’; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल भडकल्या

मुंबई | अभिनेत्री अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर अनेक आरोप केले आहेत. त्या ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

आई माझी काळुबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आलं. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे.

सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे सुरू असायचे. मध्येच डोकं दुखतं म्हणायची, मध्येच शूटिंग थांबवायला सांगायची, मध्येच रडत बसायची. शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण मी तिला समजून घेतलं, असं अलका कुबल म्हणाल्यात.

सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे हे तिचं सुरूच असायचं. शूट सुरू झाल्यावर पण तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाइलाजाने रात्री शूट करावं लागायचं. या कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येते, कोणाच्या जिवावर माज करतात, असं अलका कुबल म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या-

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

“मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र”

’14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले’; आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक गौप्यस्फोट

“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा”

मी निवृत्त होतेय पण…- पी. व्ही. सिंधू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More