बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आश्चर्यकारक! मेलेल्या मुलाला कवटाळून आईचा आक्रोश अन् क्षणातच….

चंदिगड | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच अनेक आश्चर्यचकित करण्याऱ्या घटना समोर येत आहे.

हरियाणा येथील आईच्या प्रेमानं सगळ्यांना आश्चर्यचकीत केल्याची घटना समोर येत आहे. 20 दिवसांपूर्वी 6 वर्षाच्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. संबंधित मुलगा मृत झाला म्हणून कुटुंबानी अंत्यसंस्काराची तयारीही केली. मात्र मुलाच्या आईनं त्याच्या मृतदेहाला कवटाळून हंबरडाच फोडला. मुलाला कुशीत घेऊन पोरा उठं रं..पोरा उठं डोळं उघड..अशी विनवणी करू लागली. काही वेळात मृतदेहाच्या शरीरात हालचाल जाणवली.

वडील हितेश यांनी मुलाच्या चेहऱ्यावरील चादर हटवली आणि त्याला तोंडातून श्वास देऊ लागले. शेजारील सुनीलने मुलाची छाती दाबण्यास सुरुवात केली आणि अचानक मुलानं तोंडातून श्वास देणाऱ्या वडिलांच्या होटावर दाताने पकडलं. लगेचच त्याला रोहतकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलाच्या वाचण्याचे केवळ 15 टक्के चान्स आहेत, असं डॉक्टर म्हणाले. त्यानंतर आता मुलगा पूर्णपणे बरा होऊन मंगळवारी तो त्याच्या घरी परतला आहे.

दरम्यान, मंगळवारी रोहतकच्या हॉस्पिटलमधून तो उपचार घेऊन पुन्हा हसत-खेळत घरी परतला आहे. मुलाचे आजोबा विजय शर्मा तर हा चमत्कार असल्याचं सांगत आहेत. या घटनेनं गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या – 

“आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”

35 हजार लसी पडुन असल्याने ‘या’ महापालिकेचा लसीकरण सर्वांना सक्तीचं करण्याचा विचार

“काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू”

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क – पुणे प्रशासन

‘या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे’; प्रदीप शर्मांना अटक झाल्यावर भाजपची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More