Top News देश

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण? पाहा काय आहे सत्य…

Loading...

नवी दिल्ली |  गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे, असा एक स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे भाजप समर्थक आणि अमित शहा यांच्या समर्थकांमध्ये चिंतेची लाट आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा आहे. अमित शहांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे.

अमित शहांना कोरोनाची लागण झाली असल्याचं अनेक युझर्सने म्हटलं होतं. आज तक या वाहिनीची ब्रेकिंग प्लेट अनेक नेटकऱ्यांनी शेअर करत अमित शहांना कोरोनाची लागण झाली, असं म्हटलं होतं. परंतू या दाव्यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

अमित शहा गेल्याच आठवड्यात इटलीहून परतले आहेत. ते कोरोना संसर्गाच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असा दावा अनेक नेटकऱ्यांनी केला होता. मात्र अमित शहांना कोरोना झाला नाही, हे त्यांनीच केलेल्या एका ट्विटमधून समोर आलं आहे.

अमित शहा यांनी पंतप्रधान आणि केंद्रिय मंत्रीमंडळासोबतच्या एका बैठकीचा फोटो ट्विट करत आम्हीही सोशल डिस्टसिंग पाळत आहेत. तुम्हीही पाळा, असं म्हणत #IndiaFightsCorona असा हॅशटॅग वापरला होता.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे

महत्वाच्या बातम्या-

विदेशी खेळाडूंची भरघोस मदत… कोहलीची 688 कोटीची संपत्ती मात्र मदतीचा हात आखडता!

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत खाकी वर्दीवर हात; अजित पवार काय कारवाई करणार याकडे लक्ष

पोलीसदेखील एक माणूस आहे, त्यांच्यावर किती ताण देणार- जयंत पाटील

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या