पुणे | महाराष्ट्रातून यावेळी 45 खासदार निवडून द्या, असं आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केलं आहे. ते पुण्यात शक्ती केंद्र संमेलनात बोलत आहेत.
पुण्यात बोलताना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून हल्लाबोल केला. महाराष्ट्राला खाली आणण्याचे काम काॅंग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने केले आहे, अशा शब्दांत ते काँग्रेस-राष्ट्रवादीवर बरसले.
एस.सी, एस.टी च्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिलं, 2014 ते 2019 दरम्यान आम्ही देशातली घराणेशाही संपुष्टात आणली, असंही अमित शहा म्हणाले.
दररम्यान, आज अमित शहांनी पुण्यातून लोकसभा निवडणुकींचं रणशिंग फुंकलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–महाराष्ट्रात भाजप पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार- देवेंद्र फडणवीस
–मुख्यमंत्र्यांच्या पुणे येथील घणाघाती भाषणातील ‘महत्वाचे मुद्दे’ वाचा एकाच ठिकाणी
-बारामतीत यंदा कमळच फुलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली सिंहगर्जना
–राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न
–सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले