Top News खेळ

कधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की!

नवी दिल्ली | भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने दोन दिवसांत 555 धावा काढल्या. त्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं द्विशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. जो रुट हा आपल्या 100 व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रुटच्या या अफलातून खेळीनंतर इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॅाफ यांनी त्याचं कौतुक करत बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

2016 च्या ट्वेंटी-20 वल्ड कप स्पर्धेदरम्यान फ्लिंटॅाफनं एक ट्विट केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की विराट जर याच गतीने खेळत राहीला तर तो एकदिवस नक्कीच जो रुटची बरोबरी करु शकेल. याच ट्विटला अमिताभ बच्चन यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं होतं की कोण आहे हा रुट त्याला मुळापासून उखडून टाकू.

यावरुन फ्लिंटॅाफनं शनिवारी अमिताभ बच्चन यांच्यवर निशाणा साधला. फ्लिंटॅाफनं ट्विट करत म्हटलं आहे की, अमिताभ बच्चन यांचा मी आदर करतो. पण आता त्यांचं वय झालं आहे.

दरम्यान, 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रुटनं चेन्नईवर 218 धावांची खेळी करत विश्वविक्रम केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’- रोहित पवार

छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटवर राज ठाकरेंचं नेमकं बोट; पाहा व्हिडीओ

‘आम्ही शरजीलसोबत आहोत’; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा उस्मानीला पाठिंबा

धक्कादायक! 27 वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या