बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुन्हा युती होऊ शकते, प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले- गिरीश बापट

पुणे | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलंय. यावर भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिवसेनेची पुन्हा युती होऊ शकते, असं गिरीश बापट यांनी म्हटलंय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते, असं मत गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे.

भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं गिरीश बापट म्हणाले.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजपा युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही खासदार गिरीश बापट म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार

“मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही”

“आम्ही वाघाच्या काळजाचे, शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठिशी ठाम उभी”

“एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय”

“स्वबळाची भाषा करण्याआधी फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More