बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंद महिंद्रांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, वाचा नेमकं कारण काय?

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्या आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे रोड शो केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिंद्रा थारने गाडीने रोड शो केला. त्यावरून महिंद्राचे समुहाचे सर्वेसर्वो आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत पंतप्रधानांचे आभार मानले. महिंद्राच्या ज्या एसयूव्ही कारमध्ये पंतप्रधानांनी रोड शो केला ते महिंद्राच्या थार कारचे ओपन मॉडेल होते. अनेक महागड्या गाड्यांनी पंतप्रधान रोड शो करू शकत असतानाही त्यांनी महिंद्राच्या कारचा वापर केला. भारतीय कंपनी महिंद्राने तयार केलेली थार कार देशात खुप लोकप्रिय आहे. स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल इंजिनसाठी या गाडीला पसंती दिली जाते.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत धन्यवाद प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, असं लिहिलं आहे. विजय परेडसाठी मेड इन इंडिया वाहनापेक्षा दुसरं काही चांगलं नाही आणि आनंद महिंद्रा यांनी एक इमोजी देखील शेअर केला आहे. पंतप्रधानांनी वापरलेल्या सेकंड जनरेशन थारमध्ये 18 इंच अलॉय व्हिल्स मिळतात. कोणत्याही रस्त्यावर चालण्यासाठी ही गाडी सर्वोत्तम समजली जाते.

दरम्यान, उत्तर प्रदेशात विजय मिळवल्यानंतर आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये  रोड शो केला होता. गुजरात विधानसभा निवडणूक देखील 2022 मध्येच होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी महिंद्राच्या थार कारचा उपयोग केल्याने आनंद महिंद्रा यांनी आभार मानले आहेत.

पाहा ट्विट-  

थोडक्यात बातम्या- 

नवाब मलिकांना सोडविण्यसाठी मागितली ‘इतक्या’ कोटींची लाच, मलिकांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा

“महाराष्ट्रातही आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही”

चहा महागला! आता ‘इतक्या’ रुपयांना मिळणार चहा, वाचा नवे दर

ऑनलाईन क्लासेसचे लहान मुलांवर होतायेत दुष्परिणाम, तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ उपाय

कधीही लाॅकडाऊन न लागलेल्या देशात कोरोनाचा उद्रेक, समोर आली धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More