बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंची उचलबांगडी होणार; अनिल देशमुखांनी केली मोठी घोषणा

मुंबई | मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर विधानसभेत याविषयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत होते. याप्रकरणावरून भाजप नेत्यांनी वझेंच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर अनेक आरोप केले.

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सचिन वाझे यांचं निलंबन करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. विरोधीपक्षाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून हटवणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

सचिन वाझेंना निलंबीत करून अटक करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात लावून धरली आहे. त्यामुळं सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. तर सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

सचिन वाझे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन भाजपच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतलं होतं. या गदारोळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. यानंतर अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून हटवणार असल्याचं देशमुखांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये- संजय राऊत

‘सॉरी, तुला खूप त्रास दिला…’; नेटकऱ्यांनी मागितली रिया चक्रवर्तीची माफी

सचिन वाझेंच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट; राजकीय दबाव वाढला!

स्त्री होण्यासाठी पुरूष करतायेत लिंग बदल; गुजरातमध्ये लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर…- ज्योतिरादित्य शिंदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More