बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले. त्यासोबतच त्यांच्या वरळीच्या निवासस्थानावरही छापेमारी सुरू होती. ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज ईडीचे अधिकारी आले. त्यांना सहकार्य करण्यात आले. परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही, अस सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अँटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर यांची संशयास्पद भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. तसेच याप्रकरणात एनआयएने अटक केले सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, सुनील माने तसेच अन्य अधिकारी त्यांनाच रिपोर्ट करत होते. यात त्यांचाच हात आहे. त्यामुळे सिंग यांना पदावरुन हटवल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, परमबीर सिंह यांनी आयुक्त पदाच्या खुर्चीवर होते तेव्हा त्यांनी आरोप का केले नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित करत एनआयएच्या तपासात सत्य समोर येईलच असा विश्वास व्यक्त केला. तसेच माझ्याकड़ून केंद्रीय तपास यंत्रणाना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं देशमुख म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“सुप्रियाताईंची धडपड केविलवाणी, लोकसभा निवडणुका नसल्याने ताई पुण्यात जास्त नसतात”

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास इतक्या लाख जणांना संसर्ग होण्याची शक्यता”

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराची आजची आकडेवारी दिलासदायक

कौतुकास्पद! कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन चिमुकल्यांची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली

लसीकरणात महाराष्ट्राने मारला टॉप! देशात 3 कोटी लसीकरण करणारं पहिलं राज्य

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More