‘साबरमती के संत’ गाण्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा अपमान!

चंढीगढ | ‘साबरमती के संत’ या गाण्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचा अपमान होतो, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी केलंय. ते हरियाणात एका कार्यक्रमात बोलत होते.

सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव यांनी अन्य वीरांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केला, आपलं बलिदान दिलं. त्यामुळे ‘देदी हमे आझादी बिना खडग, बिना ढाल’ असं म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे, असं वीज यांनी म्हटलंय.

दरम्यान, बेजबाबदार वक्तव्य करणं, अनिल वीज यांची सवय असल्याचं म्हणत काँग्रेसनं त्यांच्यावर टीका केलीय.