महाराष्ट्र मुंबई

“अमृता फडणवीसांबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीसांनी खपवून घेतली असती का?”

मुंबई | एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत भाजपचा राजीनामा दिला आहे. यावेळी एकनाथ खडसेंनी अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला. अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्या दाव्यांचं खंडन केलंय.

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असं दमानिया यांनी सांगितलंय.

मी दाखल केलेल्या एफआयआरवर पुढे काहीही झालं नाही. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. याप्रकरणात फडणवीसांनी सोयीचं राजकारण केलं, असं म्हणत दमानिया यांनी फडणवीांवर देखील टीका केली आहे.

ती बाई गोंधळ घालत होती म्हणून गुन्हा दाखल करावा लागला, असं फडणवीस म्हणाल्याचं खडसे यांनी वृत्तवाहिन्यांवर सांगितलं. अमृता फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीसांनी ते खपवून घेतलं असतं का?, असा सवाल दमानिया यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या म्हणत शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाने हसन मुश्रीफांची गाडी रोखली!

पंकजा मुंडेना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण?; फडणवीसांचा टोला

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण…- रामदास आठवले

“भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या