नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने यासाठी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
महाशय केजरीवाल, कितीला विकले गेलात? अशी कडवट टीका अनुरागने केली आहे. त्याने यासंदर्भात ट्विट केलं आहे. कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याने तो चांगलाच नाराज झाल्याचं दिसतंय.
कन्हैया कुमारनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी दिल्याबद्दल केजरीवालांचे आभार. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी आणि या प्रकरणाचा न्यायालयातच न्याय व्हावा. सत्यमेव जयते, असं तो म्हणाला आहे.
दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यसह 14 जणांनी देशविरोधी घोषणांचे समर्थन केले व बेकायदा निदर्शने केले असल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित प्रकर दिल्ली सरकारमुळे अडून होते.
Mahashay @ArvindKejriwal ji.. aap ko kya kahein .. spineless toh compliment hai .. aap to ho hi nahin .. AAP to hai hi nahin .. कितने में बिके ? https://t.co/nSTfmm0H8r
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) February 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
हे लोक देशाला गुजरात बनवून टाकतील; विजेंदर सिंहची टीका
मुसलमान असूनही स्वत:ला भारतात खूप सुरक्षित समजतो- अदनान सामी
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील वातावरण खराब आहे; अमोल मिटकरींची गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी
बहिणीच्या आवाहनाला मंत्री धनंजय मुंडेंचं उत्तर!
‘मोदींनी जे गुजरातचं केलं तेच दिल्लीचं करत आहेत’; इम्रान खान यांचं मोदींवर टीकास्त्र
Comments are closed.