नवी दिल्ली | पापड खाल्ल्यानं कोरोना बरा होतो, असा धक्कादायक दावा केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी केल्यानं एकच खळबळ माजली होती. मात्र मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. शनिवारी ( 8 ऑगस्ट ) मेघवाल यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मेघवाल यांनी स्वतः ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. यावेळेस मेघवाल म्हणाले की, कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता टेस्ट निगेटीव्ह आली होती. मात्र दुसरी टेस्ट केली असता माझी टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे.
तसेच माझी प्रकृती उत्तम असून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही मेघवाल यांनी यावेळेस व्यक्त केली आहे.
दरम्यान,मेघवाल यांच्या हस्ते काहीच दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीचा पापड लाँच करण्यात आला होता. या कार्यक्रमात अर्जुन मेघवाल यांनी थेट असा दावा केला की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, या पापडाने तुमच्या शरीरात आवश्यक त्या अँटीबॉडीज तयार होतील. मेघवाल यांच्या वक्तव्यानं त्यांना सोशल मीडियावरही ट्रोल करण्यात आलं होतं.
कोरोना के शुरूआती लक्षण आने पर मैंने टेस्ट करवाया व पहली जाँच नेगेटिव आने के बाद आज दूसरी जाँच पॉजिटिव आई है।
मेरी तबीयत ठीक है परन्तु चिकित्सकीय सलाह पर AIIMS में भर्ती हूँ। मेरा निवेदन है कि जो लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया अपने स्वास्थ्य का ध्यान रखे ।— Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) August 8, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
गुगल त्यांची सर्वात प्रसिद्ध असलेली ‘ही’ सुविधा बंद करणार…!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…..
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह