Top News अहमदनगर महाराष्ट्र

…तर फडणवीस-मोदींशी चर्चा करून तोडगा काढू’; ‘या’ माजी मंत्र्याने अण्णांना केली विनंती

अहमदनगर | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. या कायद्याविरोधात आपणही आंदोलन करणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेतली आहे.

अण्णा, आंदोलन करू नका, गरज पडली तर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धीमध्ये येत अण्णांची भेट घेतली. मागील आंदोलनावेळीसुद्ध गिरीष महाजन यांनीच मध्यस्थी केली होती.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतर मंतर येथे जागा मिळाली तर आपण शेवटचे आंदोलन करणार असल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं होतं. त्यामुळे आता अण्णा हजारे आंदोलन करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचा मोठा फटका; रिंकू राजगुरु अडकली या संकटात!

…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील- राहुल गांधी

औरंगाबादमधील विचित्र घटना! कोरोना होऊन गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी

आमदार निलेश लंके यांनी केलेल्या ‘त्या’ आवाहनाला मोठं यश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या