देश

पुराचं पाणी ओसरतंय तोच केरळवासियांसमोर ‘हे’ भयानक संकट

तिरुवंनतपुरम | केरळमधील पुराची परिस्थिती ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता त्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे. 

पुराच्या पाण्यामुळे अनेकांच्या घर, दुकान, कार्यालयात मोठ्या प्रमाणात साप शिरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्पदंशाच्या तक्रारी राज्यभरात वाढल्या आहेत. राज्यातील अनेक रूग्णालयात सर्पदंशाने पीडित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आता राज्यभरातून सर्पमित्रांची मदत मागितली जात आहे.

दरम्यान, आतापर्यंत 50 हून अधिक रूग्ण हे सर्पदंशामुळे आले असल्याचे डॉ. जोसेफ के जोसफ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास

-चार दिवसांनंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’त ही शनाया दिसणार नाही!

-माझं ऐकलं असतं तर दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली नसती!

-निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय!

-कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचा भिवंडीत धुडगूस; नागरिकांची एकच पळापळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या