नागपूर | मुंबई शहरातून संपूर्ण भारत देशात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड अरुण गवळी याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी अरुण गवळीची प्रकृती खालावल्याचे जाणवले. यावेळी अरुण गवळी याच्यासह कारागृहातील अन्य पाच कैद्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. आज या चाचणीचा निकाल पाॅसिटिव्ह आला असून सध्या या पाचही जणांना कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
चाचणी पाॅझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाची प्रकृती सध्या स्थीर आहे. त्यांना तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे देण्यात येणार आहेत. याशिवाय विलगीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढील माहिती दिली जाईल, अशी माहिती यावेळी अनुपकुमार कुमरे यांनी दिली.
दरम्यान, कोरोना प्रभाव जनसामान्यांच्या आयुष्यावर झाला होता. जेलमधील कैदी मात्र त्यापासून सुरक्षित असलेले पहायला मिळत होते, मात्र आता जेलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यानं कैद्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे.
थोडक्यात बातम्या-
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी
धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल
भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!
5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता