देश

“बीसीसीआयच्या वाढीसाठी दिवंगत अरुण जेटलींचं योगदान मोठं”

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री, दिवंगत अरुण जेटली यांचं बीसीसीआयच्या वाढीसाठी मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या योगदानामुळेच बीसीसीआय आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. दिल्लीतली फिरोज शहा कोटला स्टेडियमचं नामकरण ‘अरुण जेटली स्टेडियम’ करण्यात आलं आहे.

स्टेडियमच्या एका पव्हेलियन स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात आलं आहे.

अरुण जेटली यांनी क्रीडा संघांना निधी मिळवून देण्यासाठी ते कायदेशीर लढाई लढायचे. बीसीसीआयला त्यांनी दिलेल्या योगदानामुळे बीसीसीआयची इथपर्यंत वाटचाल झाली आहे. आयपीएल आल्यानंतरही टेस्ट, वनडे आणि टी-20 चा फॉर्मेट कायम ठेवण्यासाठी जेटलीनं कार्य केलं आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

कोणतीही अडचण असायची तेव्हा आम्ही जेटलींचा धावा करायचो. त्यांच्याकडे आमच्या प्रत्येक समस्येचं समाधान असायचं. रात्री उशिरा केव्हाही त्यांना फोन केला तरी ते फोन उचलायचे. त्यातून त्यांची खेळाप्रती ते समर्पित असल्याचं यातून दिसून येतं, असंही शहा म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या