Top News पुणे महाराष्ट्र

‘चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा’; विजयी उमेदवार अरूण लाड यांचा टोला

पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरूण लाड यांनी भाजपचा गेली 20 वर्षे बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाला सुरूंग लावत विजय मिळवला आहे.  त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांनी  प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांमुळे विजय सोपा झाल्याचं सांगतिलं.

चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण ते दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते. पण ज्या पदवीधरांच्या जीवावर ते निवडून गेले होते. त्यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नसल्याचं अरूण लाड यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी टीव्हीवर मुलाखत दिली आणि म्हणाले की मी दोनदा निवडून आलो आहे. माझं राहिलेलं काम पुर्ण करण्यासाठी भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या पण तुम्हीच काही काम केलं नसल्याने देशमुखांना का निवडून द्यायचं, असंही लाड म्हणाले.

दरम्यान, लोकांना हेच पटलं नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय खटकला त्यामुळे लोकांनी मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं असल्याचं अरूण लाड यांनी सांगितलं.

मराठी बातम्या-

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार

‘आत्महत्या करणारे शेतकरी भेकड’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य

“…हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रू काढणं हे अजित पवार सांगू शकतात”

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा डंका, सतीश चव्हाणांची हॅट्रीक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या