बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आर्यन खानला फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंची नोकरी जाणार”

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सापडले आहेत. आर्यनच्या प्रकरणानंतर आता अनेकांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका लावली आहे. अशातच राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर ट्विटरवर वानखेडेंवर आरोपांची झोडच लावलीय. यातच नवाब मलिक नवनवीन ट्विट करत खळबळजनक खुलासा करत आहे.

नवाब मलिक यांनी नुकतंच समीर वानखे़ेडेंवर आरोप करत काही कागदपत्रे सादर केली आहेत. ही सगळी कागदपत्र बनावट असल्यास ते राजीनामा देतील, असंही त्यांनी म्हटलंय. यातच आता आर्यन खानला या प्रकरणी फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंना आपली नोकरी गमवावी लागणार असल्याचं नवाबांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडेंविरुद्ध सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्यास मी राजीनामा देईल, अन्यथा समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा, असं नवाब मलिक यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटलं. यातच आरोपांचं सत्र सुरु असताना आता समीर वानखेडेंची चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, समीर वानखेडे प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांची खेळी पहायला मिळत आहे. आजही नवाबांनी नवीन गौप्यस्फोट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला. यामुळे आता या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, वाचा आजचे ताजे दर

‘… तर समीर वानखेडेंची बदली केली जाईल’, एनसीबी महासंचालकांनी केलं स्पष्ट

सततच्या परिक्षेच्या गोंधळावरून अखेर आरोग्य विभागाने उचललं ‘हे’ पाऊल

“सत्य कथन करून मलिकांनी झाकली मुठच उघड केली”

लोकल प्रवास करायचा असेल तर आता ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More