बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोहन भागवत यांच्यावर असदुद्दीन ओवैसींचा पलटवार, म्हणाले…

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच हिंदु- मुसलमानांमध्ये मतभेद नाहीत, हिंदु- मुसलमान एक आहेत, असं वक्तव्य केलं आहे. भागवतांच्या या वक्तव्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी मोहन भागवतांवर टीका केली आहे. अशातच आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवतांवर पलटवार केला आहे.

भागवतांवर पलटवार करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आरएसएसचे भागवत म्हणाले लिंचिंग करणारे हिंदुत्वविरोधी आहेत. मात्र, भ्याडपणा, हिंसाचार आणि हत्या ही गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा अविभाज्य भाग आहेत. मुस्लिमांची लिंचिंग देखील याच विचारसरणीचा परिणाम आहे.

तसेच केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते अलिमुद्दीनच्या खुन्यास पुष्पहार घातला जातो. अखलाकच्या मारेकऱ्यांच्या मृतदेहावर तिरंगा ठेवण्यात आला. आसिफला ठार मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलवली जाते. जिथे भाजपचे प्रवक्ते म्हणतात की, आम्ही काय हत्या देखील करु शकत नाही का?, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाही एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून मुस्लिमांना आपली ओळख संपवण्याची किंवा नष्ट करण्याची काहीच गरज नाही. मुळातच हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, असं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांसह भाजपचे सगळे आमदार माझ्या एकट्यावर तुटून पडले”

अशा कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सहन करु, पण…- रावसाहेब दानवे

शशी कपूर यांचा नातू लवकरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

अबब..! चांदीच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ; वाचा सोन्या-चांदीचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More