मुंबई | ‘बीएसई’ला दोन कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. यावरून महापालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना? असा सवाल आशिष शेलार यांनी काला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने बीएसईवर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???… वा ही तर टाटा, बिर्लांची सेना, असं ट्विट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
या प्रकरणी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले असून, जो न्याय ‘ताज’ला तोच ‘बीएसई’लाही लावण्याची मागणी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने “बीएसई” वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…
तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???…वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2021
थोडक्यात बातम्या-
शिवबंधन सोडत ‘या’ शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
शिवसैनिकांनो…सध्या मोर्चाची गरज नाही- संजय राऊत
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?- किरीट सोमय्या
पत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी!
आमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!