बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांना कमालीचं महत्व आहे. कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष संपुर्ण ताकद लावून निवडणुका लढताना दिसतात. आता पुन्हा चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकांची  रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. निवडणुक आयोगाने  या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

निवडणुक आयोगाने आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका लावल्या आहेत तर, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात देखील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पाचही विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रकिया 27 मार्चपासून सुरू होणार आहेत. तर या पाचही निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 2 मे ला जाहीर होणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका 8 टप्प्यांत होणार आहे. या मध्ये पहिल्या टप्प्यांसाठी 27 मार्चला तर शेवटच्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे.  तर आणखी 6 टप्पे 1,6,10,17,22 आणि 26 एप्रिलला होणार आहेत. दुसरीकडे आसाम मध्ये 27 मार्च , 1 आणि 6 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी यांच्या निवडणुका 6 टप्प्यात होणार आहेत.

दरम्यान, या पाचही विधानसभांपैकी पश्चिम बंगालच्या निवडणुका सर्वात आकर्षक असतील. भाजपने पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी पुर्ण ताकद लावली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या रणधुमाळीत उतरले आहेत. तर ममता बॅनर्जी देखील भाजपला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. तर राहुल गांधी सातत्याने दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुका चांगल्याच रंगताना दिसतील.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरु, चित्रा वाघ यांना केलं जातंय टार्गेट!

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही…

पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

‘…तर 1 मार्च पासून दूध 100 रूपये प्रतिलिटर दराने विकणार’; शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More