राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 

अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अवधूत तटकरे शिवसेनेत गेल्यास राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असेल.

राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय समिकरणांची जुळवाजुळव सुरु असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, तटकरे काका-पुतण्यामध्ये सारं काही आलबेल नाहीये. शरद पवार यांनी स्वतः हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-आज कंदिल घेऊन आलोय, उद्या मशाली घेऊन येऊ; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

-शरद पवार मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात!

-राज्याच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

-मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल; अमित शहांची घेणार भेट

-शिवसेनेचा मुहूर्त ठरला; या दिवशी फुंकणार निवडणुकीचं रणशिंग!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या