बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निशब्द भावनांना बच्चू कडूंची साथ, ‘त्या’ चिमुकल्याला मिळाली सायकल!

अहमदनगर | अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील हातावर पोट भरून संसाराचा गाडा चालवत असतानाच अचानक घरांना आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्यासह चिमुकल्याच्या आवडत्या सायकलचा सांगाडा झाला.

आई – वडिल घराची राख झाल्याने हताश झाले असतानाच चिमुकला मात्र सांगाडा झालेल्या सायकलकडे निशब्द होऊन बघत बसला होता. या चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

सोशल मीडियात हा फोटा पाहून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या चिमुरड्यासाठी नवीन सायकलही पाठवली आहे. प्रहारचे अहमदनगर येथील पदाधिकारी यांनी रविवारी तातडीने सर्व साहित्य घेऊन कोभाळणे येथे दाखल झाले.

घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने या चिमुकल्याच्या कुटूंबियांना देण्यात आली आहे. तसेच त्यांनी यावेळी आणखी मदतीचा शब्द दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात लागू शकतो ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन; महत्त्वाची माहिती आली समोर

उद्धव ठाकरेंना फोन करून फडणवीसांनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

“कोरोना पळून गेलाय, आता मास्क घालण्याची गरज नाही”

विराट कोहलीनं काढलं, शाहरुख खाननं घेतलं; ‘हा’ खेळाडू पुन्हा IPLच्या रणांगणात!

शेवटचं खेळताना पाहा; कारण ‘हे’ तीन दिग्गज पुन्हा IPL खेळण्याची शक्यता नाही!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More