बाहुबलीचा कल्ला, हजार कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट

बाहुबली सिनेमाचे एक पोस्टर

नवी दिल्ली | बाहुबली २ ने कमाईच्या बाबतीत विश्नविक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या ९ दिवसात बाहुबलीने हजार कोटीच्या कमाईचा आकडा पार केला आहे. सिनेजाणकार रमेश बाला यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

बाहुबलीने २ ने भारतात ८०० कोटींहून अधिक तर विदेशात २०० कोटींची कमाई केली आहे. अजूनही सर्वच शहरांमध्ये बाहुबली २चे शो हाऊसफुल असल्याने चित्रपट १५०० कोटींचा आकडा पार करेल, असं जाणकारांचं मत आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या