बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बजरंग सोनावणे भाजपच्या वाटेवर? पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल

बीड | महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनावणे यांच्या भेटीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होतोयेत. त्यामुळे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असणारे सोनावणे आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून बऱ्याच नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याचा सपाटा लावलाय. त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय.

बीडमधल्या अपात्र नगरसेवकांची सुनावणी पंकजा मुंडे यांनी आपल्या बंगल्यावर ठेवली होती. या प्रकरणात सोनावणे हे याचिकाकर्ते आहेत. या सुनावणीसाठी गेलो असता आपले फोटो काढून व्हायरल केले असल्याचा दावा करत, सोनावणेंनी हे वृत्त फेटाळले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडेंनी बजरंग सोनावणे यांचा पराभव केला होता.  सोनावणे सध्या बीड जिल्हा परिषदेत चिंचोली माळी या गटाचं नेतृत्व करतात.

महत्वाच्या बातम्या-

-पुर्वी ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता ‘ईडी’चा खेळतात- जितेंद्र आव्हाड

-मुली तू माझ्या राज्यात ये… तुझी जबाबदारी मी घेतो; कमलनाथांचं उन्नाव पीडितेला आश्वासन

-रोहित पवारांच्या वाटेत काटे; रुपाली चाकणकरांची धक्कादायक मागणी

-तिहेरी तलाक विरोधात पहिली केस महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात दाखल!

-आठवले स्टाईल…! कविता काश्मीरवर अन् टीका काँग्रेसवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More