‘अयोध्येत जाऊ तेव्हा संजय राऊतांना सोबत घेऊन जाऊ’; मनसेनं डिवचलं
मुंबई | मनसे अध्ययक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, तब्येतीच्या कारणांमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तुर्तास रद्द करण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी सुरक्षा पुरवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोलेबाजी केली होती. यावर बोलताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी राऊतांना डिवचलं आहे.
आम्ही अयोध्येला जाऊ तेव्हा संजय राऊतांना सोबत घेऊन जाऊ. ते सोबत असतील तर आम्हाला सुरक्षा मिळेल, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. आता तुमच्याकडून सुरक्षा घ्यायची तेवढं बाकी आहे, अशी खोचक टीकाही नांदगावकरांनी केली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया पार पडणार असल्याची माहितीही बाळा नांदगावकरांनी दिली. तर पुण्यातील सभेत राज ठाकरे सर्व उत्तरं देतील. उलट सुलट चर्चा करण्याची गरज नाही, असंही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
अयोध्या दौरा स्थगित होताच राज ठाकरेंच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित
बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच…
युक्रेनमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती
मोठी बातमी! संभाजीराजेंसाठी शिवसेना खेळी करण्याची शक्यता!
Comments are closed.