मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या विजयामुळे नेतेमंडळी भारतीय संघाचं, संघातील खेळाडूंचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचं कौतुक करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं आहे.
शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील तरुणास संधी मिळाल्यास तोदेखील त्याचे नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो, हे अजिंक्य रहाणे यांनी आज जगाला दाखवून दिलं आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
सगळ्या भारतीयांसाठी आणि संगमनेरवासियांसाठी आज आनंदाचा क्षण आहे. अजिंक्य रहाणेंच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकणं आणि इतिहास रचणं हे अभूतपूर्व आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“संघ एका रात्रीत उभा राहिलेला नाही, हे विराट कोहलीच्या मेहनतीचं फळ”
“मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या”
‘सॉरी पप्पा, मला जगण्याचा अधिकार नाही’; फेसबुक पोस्ट करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
खासदारांना आता जेवणाचे पूर्ण पैसे भरावे लागणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
”जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ”