Top News

ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ दिवसापर्यंत बंद राहणार- झुकरबर्ग

वॉशिंग्टन | डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ज्यो बायडन यांनी अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामचा उपयोग करता येईल, असं झुकरबर्ग यांनी म्हटलंय.

ट्रम्प अध्यक्ष पदावरून पायउतार होईपर्यंत त्यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद राहील. त्यामुळे ट्रम्प पुढील दोन आठवडे फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकणार नाहीत.

पॉलिसीच्या उल्लंघनामुळे फेसबुकने राष्ट्रपतींच्या खात्यावर 24 तास बंदी घातली होती. ट्विटरनेही ट्रम्प यांच्या हँडलवर 12 तास बंदी घातली होती. ट्रम्प यांच्या समर्थकांनी शांततेत सत्ता हस्तांतरण रोखण्यासाठी कॅपिटल बिल्डिंगवर हल्ला केला. कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचारात चार जण ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस अधिकाऱ्याच्या गोळीने एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक महिला आणि दोन पुरुष कॅपिटल मैदानाजवळ आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू पावले.

थोडक्यात बातम्या-

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह

विराट-अनुष्काला मुलगा होणार की मुलगी?; ज्योतिषानं केली ‘ही’ भविष्यवाणी

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्र सरकारने करायला हवा- राजेश टोपे

“संभाजी महाराज आम्हाला माफ करा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या