बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद; मार्च एंडची लागणार वाट

मुंबई| कोरोनानं राज्यात तसंच देशभरात थैमान घातलं आहे. देशभरात आत्तापर्यंत कोरोनामुळं 3 जणाचा मृत्यु झाला आहे. तर देशात 126पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहे. सरकारी त्याचबरोबर खासगी कामांबरोबरच या बंदचा परिणाम बँकांवर देखील होणार आहे. बँकांच्या संघटनांनी 27 मार्चला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन  या दोन संघटनांनी ऐन मार्चच्या शेवटीच संप पुकारल्यामुळे कामं खोळंबणार आहेत. पुढच्या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी बँका सुरू असणार आहेत. त्यानंतर 25 मार्चला बुधवारी गुढी पाडवा आणि अन्य सणांमुळं बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, जम्मू, मुंबई, नागपूर, गोवा येथील बँका बंद राहणार आहेत.

11 मार्चलाही संपाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हा संप मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा केंद्र सरकारने 10 बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिल्याने त्याविरोधात संप पुकारण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

मुंबईची लोकलसेवा बंद होणार नाही पण मुंबईकरांनो….

सावधान… मुंबई-पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला!

पाकिस्तानवरही कोरोनाचा ‘अ‌ॅटॅक’, घेतला पहिला बळी तर 184 जणांना कोरोनाची लागण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More