पुणे | पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
पुण्यात पुन्हा कोरोनाचा आलेख वाढताना दिसतो आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा आता १०% पर्यंत जाउन पोहोचला आहे. पुण्यात सोमवारी एकूण १९३ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या १६८३ वर पोहोचली असून आज १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये सोमवारी दिवसभरात १०० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले.
थोडक्यात बातम्या-
भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!
गुंड गजानन मारणेची तुरुंगातून सुटका, 500 गाड्या स्वागताला; पाहा 5 व्हायरल व्हिडीओ-
आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!
रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???