नागपूर महाराष्ट्र

मी पळून गेलो नव्हतो; महिलेला पळवून नेण्याचा आरोप असणाऱ्या महाराजाचा खुलासा

भंडारा | भागवत कथेच्या माध्यमातून नैतीकतेचे धडे देणाऱ्या एका महाराजाने एका विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या बातम्या माध्यमात आल्या होत्या. यावर महाराज दिनेश मोहतुरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी पळून गेलो नव्हतो, असं महाराजांनी म्हटलं आहे.

मी माझ्या घरी सुखरुप आहे. मी वारकरी संपद्रायातील असून आज माझे गुरु माझ्यासोबत आहेत. माझे मुलं व पत्नीसोबत मी घरीच आहे, केवळ बदनामीसाठी या बातम्या पसरवण्यात आल्या, असं मोहतुरे म्हणाले आहेत. तसेच माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवल्या असंही ते म्हणाले आहेत.

मी माझ्या कामासाठी वृंदावनला गेलो होतो. त्यावेळी पोलिसांनी मला ताब्यात घेतले. बिनबुडाचे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत. माझ्या विरोधकांना माझी महती बघवत नाही, त्यामुळे त्यांनी ही अफवा पसरवली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराजांच्या भागवत कथेचा कार्यक्रम संपला त्याच दिवशी एक महिला गावातून गायब झाली होती. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

‪हिंगणघाट पीडितेसंदर्भात आंदोलन करताना भाजप नेत्यांचा हास्यविनोद; रुपाली चाकणकर संतापल्या

‘आप’मतलब्यांचा पराभव झाला; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

महत्वाच्या बातम्या-

काय ‘मजा’ चालली आहे ठाकरे सरकारची; किरीट सोमय्यांची टीका

आदित्य- नेहाच्या लग्नाबद्दल उदित नारायणांचा मोठा खुलासा

आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या