Top News तंत्रज्ञान देश

बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!

नवी दिल्ली | टाटा मोटर्सच्या अल्ट्रोजला गतवर्षी चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता टाटा आपल्या नविन वर्षाची सुरुवातही बहुचर्चित आणि नव्या दमाच्या टाटा अल्ट्रोज या कारसोबत करणार आहे. कंपनी १३ जानेवारी रोजी या कारवरून पडदा हटवणार आहे.

कारसंबंधी अनेक नवीन माहिती समोर येत असून, नवीन टाटा अल्ट्रोज सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक पॉवरफुल असणार आहे. नवीन अल्ट्रोजमध्ये १.२ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळणार आहे.

नवीन अल्ट्रोजमध्ये नवीन इंजिन ११०PS पॉवर आणि ५५००rpm आणि १४०Nm टॉर्क जनरेट करते. कार १३ सेकंदात शून्यापासून ते १०० किलोमीटर पर्यंतचा वेग पकडू शकते. ही कार सुरुवातीला ५ स्पीड गियर बॉक्स सोबत येणार आहे.

दरम्यान, टाटा अल्ट्रोज १.२ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल या दोन इंजिन ऑप्शनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. टाटा मोटर्सने ऑगस्ट २०२० मध्ये अल्ट्रोज डिझेलचे बेस व्हेरियंटला सोडून बाकी अल्ट्रोज लाइन अपच्या किंमतीत १६ हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती.

थोडक्यात बातम्या-

10 चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत मुख्यंत्र्यांकडून दुःख व्यक्त; दिले चौकशीचे आदेश

भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार- अजित पवार

…नाहीतर 8 फेब्रुवारीपासून तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट आपोआप बंद होणार!

डीआरएसच्या निर्णयावरून चिडलेल्या टीम पेनने अंपायरना वापरले अपशब्द

आता गुन्हेगारांची खैर नाही!; …तर त्या फोनवाल्याला मी बघतो- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या