जीएसटी लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली | जीएसटी लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. रासायनिक खतांवर प्रस्तावित असणारा १२ टक्के कर कमी करुन फक्त ५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या १८ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

रासायनिक खतांवरचा कर कमी करण्याची मागणी देशभरातील विविध संस्था तसेच संघटनांकडून करण्यात आली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी निश्चितच फायदा होणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या