बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने भाजपच्या 14 नाराज पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

बीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात 43 नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आलं तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.

यामुळे बीडमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळाल्याने बीडमधील भाजपच्या 14 नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बेडे  आणि पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला असल्याचं सांगितलं होतं. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नसल्याचं पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

तसेच भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की, मी एवढी मोठी आहे की मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील, असं देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यातील धबधबे व इतर पर्यटनस्थळी जाण्यास बंदी!

‘…नाहीतर आधीच्या गृहमंत्र्यांसारखी आपली परिस्थिती होऊ शकते’; ‘या’ भाजप आमदाराचा दिलीप वळसे-पाटलांना इशारा

महागाईविरोधात काँग्रेसचा मुंबईत मोर्चा, घोषणा देत असताना नेते बैलगाडीवरून कोसळले; व्हिडीओ व्हायरल

”त्या’ साखर कारखान्यांची यादी पाच वर्षापुर्वी अण्णा हजारेंनी केली’; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबईत सलग 3 दिवस लसीकरण बंद, नागरिकांची गैरसोय; BMC म्हणते…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More